अहमदनगर :
अहमदनगर- कल्याण रोडवर आज पहाटे ५:३० वाजता भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीचामृत्यू झाला आहे. तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. पिकअपमधील सर्व प्रवासी हे बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्व जण मंचरहून पारनेरकडे यात्रेसाठी निघाल्याचेही सांगण्यात येत आहे. हा अपघात इतका भीषण होता की पिकअप थेट खड्यात उलटला. यात पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे.