बँकॉक – जगातील अंत्यत दुर्मिळ असा पाढरा देवमासा म्हणजेच ओम्युरा व्हेल या माशाचे थायलंडमध्ये दर्शन झाले. थायलंडच्या कोह हे पुकेतमध्ये पर्यटकांना या माशाने दर्शन घडले.पांढरा देवमासा ही दुर्मिळ घटना असून अशा प्रकारे तो पहिल्यांदाच दिसल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या माशाची त्वचा ही पांढरी असून त्याचे डोळे हे गुलाबी होते.
सहसा व्हेल हा महाकाय मासा काळ्या रंगाचा असतो. काही जैवकीय बदलांमुळे त्याला पांढरा रंग प्राप्त होतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे. या अशा प्रकारच्या माशांची प्रजाती ही मादागास्करच्या किनाऱ्या नजिकच्या समुद्रात असू शकते असेही काही तज्ञांनी म्हटले आहे. हा मासा दिसणे ही फार दुर्मिळ घटना असल्याचेही सांगण्यात येत आहे. थायलंडचे प्राध्यापक थोन यांनी सांगितले की, दहा लाख माशांमध्ये एकदाच कधी तरी हा मासा दिसू शकतो. पुकेतच्या समुद्रात सफर करणाऱ्या पर्यटकांच्या एका गटाला या माशाचे दर्शन झाले असून त्यांनी त्याचे फोटोही सोशल मीडियावर टाकले आहेत.