₹31,628 Cr Aid for 29 Districts : 3 हेक्टरपर्यंत मदत! 31628 कोटींचे सरकारचे पॅकेज, 29 जिल्हे, 253 तालुक्यांना घर, विहीर, रस्ते, पेरणीत मदत

₹31,628 Cr Aid for 29 Districts – अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीवरील खर्चासह 31 हजार 628 कोटींच्या मदतीची घोषणा आज राज्य सरकारने केली. शेतकर्यांना पिकांच्या नुकसानीपोटी कोरडवाहू शेतकर्यांना एकूण एकरी 7 हजार 400, हंगामी बागायती शेतकर्यांना एकूण एकरी 10 हजार 800 आणि बागायती शेतकर्यांना एकरी 13 हजार मदत दिली जाणार आहे. एनडीआरएफच्या नियमांच्या पुढे जाऊन […]
‘पूरग्रस्तांना तातडीची मदत करा’; शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला, म्हणाले…

Sharad Pawar Flood Advice: महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी (Heavy Rain) मुळे आणि महापुरामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले. सरकारकडून देखील शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे. या नैसर्गिक संकटानंतर पीडित नागरिकांना भेटण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांची […]
Farmers Block Ministerial Visit : मंत्र्यांना शेतकऱ्यांनी घेरले! अडवले, जाब विचारला ! मदतीच्या पिशव्यांवर शिंदेंचे फोटो पाहून संताप

Farmers Block Ministerial Visit – अतिवृष्टीने शेतजमीन खरवडून गेलेल्या मराठवाड्यात (Marathwada)आज अखेर सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde)व अजित पवार (DCM Ajit Pawar) , कृषिमंत्री भरणे (Agriculture Minister Bharne)अशा डझनभर मंत्र्यांनी दौरा केला. मात्र शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी मंत्र्यांना घेरले, त्यांच्या गाडीचा ताफा अडवला, ओला दुष्काळ कधी जाहीर करणार, असा जाब विचारला. यामुळे मंत्र्यांना अनेक ठिकाणाहून पळ काढावा लागला. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत […]
Latur Rain : लातूर जिल्ह्यात ढगफुटी ; साडेतीन तास झोडपले!

Latur Rain – लातूर जिल्ह्यातील मातोळा, लोटा आणि कवळी परिसरात पहाटे साडेतीन तास ढगफुटीसदृश (cloudburst)पाऊस झाला. मराठवाड्यातील बीड (Beed), लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती (flood) निर्माण झाली. रेणा सहकारी साखर कारखान्याच्या (Rena Cooperative Sugar Factory)कार्यक्षेत्रात सहा ते सात हजार हेक्टर क्षेत्रातील ऊस जमिनीवर आडवा पडला आहे. शासनाने पंचनामे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने […]
Punjab rain : पंजाबमध्ये महापुराचा कहर! मदतीसाठी लष्करही पोहोचले

Punjab rain – उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये सततच्या पावसामुळे (rain) पूरसदृश (flood) परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब राज्य (punjab) गेल्या तीन दिवसांपासून (last 3 days) पुराच्या विळख्यात आहे. राज्यातील सर्व शाळा (schools) ३० ऑगस्टपर्यंत(30th august) बंद ठेवल्या आहेत. याशिवाय पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या ३ हजार लोकांना वाचवले आहे. या पूरस्थितीमुळे पंजाबमधील पठाणकोट, गुरुदासपूर, तरणतारन, होशियारपूर, […]
विदर्भ, मराठवाडा व कोकणात मुसळधार पावसाचा तडाखा

मुंबई – राज्यात अकोला (Akola), बुलडाणा , वाशिम, हिंगोली, जालना, परभणी, बीड, कोल्हापूर, पालघर, ठाणे, रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आणि मुंबई व नवी मुंबईत मुसळधार आणि ढगफुटीसदृश पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. हवामान विभागाने (IMD)काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (orange alerts) तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट (yellow alert) जारी […]
कोकण, पुणे, साताऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट

मुंबई – भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department)आज आणि उद्या पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड, रत्नागिरीसह सातारा व पुणे (Pune )घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर उद्या कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण व मध्य भारताचा […]
साताऱ्यात आभाळ फाटले, सलग सहा दिवस मुसळधार पाऊस

सातारा – उन्हाळा असूनही जिल्ह्यात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.कारण, सलग सहा दिवस आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. सातारा शहरात तर पावसाची संततधारच आहे. कृष्णा आणि कोयना नदीच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना सूर्यदर्शन होईना. काल शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४३.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात धुवाधार […]
