Diabetes Symptoms information in Marathi: भारतातील आज प्रत्येक घरात मधुमेहने ग्रस्त असलेली एकतरी व्यक्ती सापडतेच. मधुमेह असा एक गंभीर आजार आहे, ज्यावर कोणताही ठोस उपचार नाही. पण योग्य काळजी आणि जीवनशैलीत बदल करून यावर नियंत्रण ठेवता येते.
शरीरातील हार्मोनच्या असंतुलनामुळे होणारा हा आजार काही लक्षणे दाखवतो, ज्याकडे दुर्लक्ष धोकादायक ठरू शकते. जर याकडे लक्ष न दिले, तर हृदयाचे आजार, किडनीचे रोग आणि मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
मधुमेहाची लक्षणे (Diabetes Symptoms information in Marathi)
- वारंवार लघवीला जाणे: रक्तातील साखर वाढल्यावर मूत्रपिंड अतिरिक्त ग्लुकोज बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे रात्रीही अनेकदा लघवीला जावे लागते. अचानक तहान आणि वारंवार बाथरूमला जाणे हे या आजाराचे लक्षण असू शकते.
- थकवा आणि अशक्तपणा: ग्लुकोज ऊर्जेमध्ये रूपांतर होत नाही, म्हणून पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे नेहमी थकल्यासारखे वाटते. झोप घेऊनही थकवा जाणवत असेल, तर सावध व्हा.
- सतत तहान लागणे: वारंवार लघवीमुळे शरीरात पाण्याची कमतरता होते, ज्यामुळे तहान लागते. जास्त पाणी पिल्यानंतरही तहान भागत नसेल, तर रक्तातील साखर वाढली असण्याची शक्यता आहे.
- लैंगिक समस्या: रक्तातील साखर वाढल्याने नसा आणि रक्तवाहिन्यांना नुकसान होते. यामुळे लैंगिक समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होतो.
- वजनात अचानक बदल: वजन वाढणे किंवा कमी होणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. टाइप-1 मध्ये स्नायू आणि चरबी कमी होतात, तर टाइप-2 मध्ये वजन वाढू शकते. कारण नसताना वजनात बदल होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
या लक्षणांकडे लक्ष देऊन वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. जीवनशैलीत बदल करून आणि नियमित व्यायामाने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.