Home / आरोग्य / Flaxseed Water Benefits : उपाशी पोटी घ्या हे पेय; शरीरातील बरीचशी दुखणी होतील नाहीशी..

Flaxseed Water Benefits : उपाशी पोटी घ्या हे पेय; शरीरातील बरीचशी दुखणी होतील नाहीशी..

Flaxseed Water Benefits : आरोग्याबाबत आज काल लोक बरेच जागृत झालेले दिसतात याकरिता लोक हल्ली वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा डाएटमध्ये समावेश...

By: Team Navakal
Flaxseed Water Benefits

Flaxseed Water Benefits : आरोग्याबाबत आज काल लोक बरेच जागृत झालेले दिसतात याकरिता लोक हल्ली वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचा डाएटमध्ये समावेश देखील करतात. यापैकीच एक सगळ्यात पौष्टिक पर्याय म्हणजे अळशीच्या बिया (Flax Seeds). या बिया छोट्या नक्की असतात पण या छोट्या छोट्या बियांमध्ये पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात असतो आणि योग्य पद्धतीने याचे सेवन केले तर आरोग्यास असंख्य फायदे देखील मिळतील. याबाबत अनेक न्युट्रिशसने माहिती दिली आहे. पाण्यात भिजवलेल्या अळशीच्या बिया रिकाम्या पोटी खाल्ल्यास अत्यंत फायदा होतो.

काही न्युट्रिशियन्सच्या मते हेल्दी फॅट्स आणि ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिडचा उत्तम स्त्रोत म्हणजे ह्या अळशीच्या बिया आहेत. हेल्दी फॅट्समुळे शरीराला ऊर्जा मिळत राहते. तसेच रिकाम्या पोटी अळशीच्या बिया खाल्ल्यास शरीराची गती देखील वाढते. तसेच ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड शरीरासह मेंदूसाठीही इंधनाप्रमाणे काम करते. काही न्युट्रिशनिस्ट सांगतात अळशीच्या बियांमुळे शरीराला लगेचच ऊर्जा मिळते, ज्यामुळे एकाग्रता क्षमता वाढायला मदत होते.

बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे आणि अ‍ॅसिडिटी यासारख्या समस्यांपासून देखील सुटका मिळते. रात्रभर पाण्यात अळशीच्या बिया भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास आतड्यांच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. एक चमचा अळशीच्या बिया मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करा, अळशीच्या बियांची पावडर ग्लासभर पाण्यात मिक्स करून सकाळी रिकाम्या पोटी हे प्या. यामुळे शरीरात अनेक चांगले बदल देखील पाहायला मिळतील.


हे देखील वाचा –Panna’s Diamond Turns Out to Be Stone : १०० कोटींचा हिरा नाही, तो तर एक साधा दगडच! पन्नाच्या दगडाची तपासणी

(टीप : वरील माहितीची पुष्टी आम्ही करत नाही. डॉक्टरच्या सल्ल्याने आपण हे सगळे उपाय करू शकता)

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या