Home / आरोग्य / Menstrual Cramps : मासिक पाळीत करून बघा हे उपाय; पोटात दुःखण थांबेल..

Menstrual Cramps : मासिक पाळीत करून बघा हे उपाय; पोटात दुःखण थांबेल..

Menstrual Cramps : मासिक पाळी बद्दलच्या अनेक तक्रारी महिलांना बऱ्याचदा असतात. मासिक पाळीत होणार त्रास आणि असह्य वेदना यामुळे अनेक...

By: Team Navakal
Menstrual Cramps

Menstrual Cramps : मासिक पाळी बद्दलच्या अनेक तक्रारी महिलांना बऱ्याचदा असतात. मासिक पाळीत होणार त्रास आणि असह्य वेदना यामुळे अनेक स्त्रिया त्रस्तच असतात. स्त्रियांचा मासिक पाळीचा त्रास तेव्हा वाढतो जेव्हा पाळी अनेक दिवस चालते आणि या दरम्यान त्यांना भरपूर शारीरिक त्रास होतो. यावर अनेक एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे की हे बायोलॉजिकल देखील असू शकतं आणि काही इतर गोष्टी जसं की, डाएट आणि शरीरात पाण्याची कमी (how to avoid dehydration) देखील वेदनांना आणखी तीव्र बनवते.

अनेक महिलांची हिच तक्रार पुढे येऊ लागली आहे की वातावरणातील थंडावा जस जसा वाढेल तस तसं पाळीमुळे पोटात दुखणं क्रॅम्प्स (home remedies for period cramps) साधारण वेदनांपेक्षा अजूनच वाढू लागतं. मासिक पाळीमध्ये महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, त्यामध्ये मुड स्विंग्स (mood swings), ओटीपोटातील वेदना (abdominal pain), कंबर आणि पाठदुखी (back an lower back pain) आणि यासोबतच डाएटमध्ये उतार-चढाव करणारी विविध पदार्थ खाण्याची इच्छा होते. या सगळ्यामुळे खूप चिडचिड होते, रडू कोसळतं, मन उदास होतं. ह्यावर काही घरगुती उपाय करून देखील आरामदायी वाटते.

पोटाच्या खालील भाग म्हणजेच ओटीपोट, पाय आणि पाठ शरीराचे असे भाग आहेत ज्यामध्ये साधारणत: पाळीमुळे अधिक दुखते. या भागांना उष्णता दिल्याने मासिक पाळीतील वेदनांपासून स्वत:चा बचाव करू शकता. तसेच जीऱ्याचं पाणी प्यायल्याने ओटापोटात होणाऱ्या त्रासापासूनही आराम मिळण्यास मदत होते. जिऱ्यांमध्ये असलेल्या लोहामुळे महिलांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी होण्यास अधिक मदत मिळते. यासाठी एक चमचा जिऱ्यात एक चमचा मध मिसळून त्याचं दररोज सेवन करावे. गरम पाण्याच्या पिशवीने ओटीपोट आणि कंबर शेकवा आणि हे शक्य नसेल तर गरम गरम पाण्याने दिवसातून दोन वेळा अंघोळ करा.

शरीरात पाण्याची पातळी योग्य असल्याने अनेक समस्या आणि आजार सहजपणे दूर होतात. पाण्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते आणि मासिक पाळीतील वेदना कमी होतात. याव्यतिरिक्त तुळशीच्या पानांच्या रसात एक चमचा मध मिसळून प्या अथवा बडिशेपच्या दाण्यांचा काढा दिवसातून एकदा घ्यावा. धने किंवा बडिशेप रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी प्या. अशा विविध पद्धतीने शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.


हे देखील वाचा 

Pollution In City : महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरे प्रदूषणाच्या विळख्यात…

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या