केपी शर्मा ओली होणार नेपाळचे नवे पंतप्रधान

काठमांडू – चीनचे समर्थक असलेले केपी शर्मा ओली हे नेपाळचे पंतप्रधान होणार आहेत. पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांचे सरकार पडल्यानंतर काल त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आहे.ओली यांनी १९६६मध्ये नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला होता. नव्वदीच्या दशकात, पंचायत राजवट रद्द करणाऱ्या चळवळीतील त्यांच्या प्रयत्नांमुळे ओली यांना लोकप्रियता मिळाली. २०१५ मध्ये ५९७ पैकी ३३८ मते […]
जैन समाजाची चातुर्माससणासाठी तयारी सुरू

सुरत – जैन बांधवांमध्ये धार्मिक महत्वाच्या चातुर्मास सणासाठी जोरदार तयार सुरू आहे.गुजरातच्या सुरतमधील आचार्य महाश्रमण प्रवास व्यवस्था कमिटी आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या स्वागतासाठी तयारी करीत आहे. २० जुलै पासून चातुर्मास सुरू होत आहे .आचार्य श्री महाश्रमणजी तेरापंथी जैन धर्मसंघाचे सर्वोच मुनी आहेत. धर्मसंघाच्या प्रमुखपदी विराजमान झाल्यानंतर तब्बल २१ वर्षांनंतर ते सुरतमध्ये येणार आहेत. आचार्य महाश्रमणजी […]
अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानात लॅपटॉपचा स्फोट

सॅन फ्रान्सिस्को – अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायामीला जाणाऱ्या विमानात प्रवाशांच्या बॅगेत ठेवलेल्या लॅपटॉपचा स्फोट झाला.अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट २०२५ हे विमान काल दुपारी १२.१५ वाजता सॅन फ्रान्सिस्कोहून मायामीला जाणार होते. त्यावेळी प्रवाशांच्या बॅगेत ठेवलेल्या लॅपटॉपमधून अचानक धूर येऊ लागला. त्यामुळे एकच खळबळ माजली.त्यानंतर स्लाइड्स आणि जेटब्रिजचा वापर करून विमानतील प्रवाशांना बाहेर काढले. प्रवाशांना उतरवताना […]
माऊलींच्या जयघोषात पालख्यांची रिंगण संपन्न

माळशिरस -माऊली माऊलीच्या जयघोषात आज सकाळी लाखो वारकरांच्या उपस्थित श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दूसरे गोल रिंगण खुडूस, माळशिरस फाटा येथे उत्साहात पार पडले. माळशिरस येथून आज पहाटे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने दूसरा गोल रिंगणासाठी खुडूस फाटाकडे आगेकूच केली होती. तर तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण माळीनगर येथे पार पडले.खुडूस फाटा येथे […]
कोकणात पुढील दोन दिवसपावसाचा ऑरेंज अलर्ट

मुंबई – रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याने पुढील दोन दिवस हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३ जुलै ते १६ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.जिल्ह्यांत बहुतांश भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता […]
पांडवकडा धबधब्यावर आता वन कर्मचारी तैनात

नवी मुंबई-पावसाळी पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या खारघरच्या पांडव कडा धबधब्यावर आता वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.या धबधब्यासह खारघरमधील तलाव परिसरातही पर्यटकांवर बंदी घालण्यात आली आहे,अशी माहिती पनवेल विभाग वन परिक्षेत्र अधिकारी डी.एस. सोनवणे यांनी दिली. पुणे येथील भुशी धरणाजवळ झालेल्या दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला होता त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या […]
एमपीएससी परीक्षा आता २५ ऑगस्टला

मुंबई -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी)राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शुद्धीपत्रक काढून मराठा उमदेवारांना ‘एसईबीसी’ अथवा ‘ओबीसी’ प्रवर्गातून अर्ज करता यावा, यासाठी ही परीक्षा पुढे ढकलली आहे. आता ती २५ ऑगस्टला होणार आहे. राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ साठी दोन वेळा शुद्धीपत्रक काढल्यानंतरही केवळ ८,३०८ उमेदवारांनी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गात (एसईबीसी) अर्ज […]
एसटी कर्मचाऱ्यांचा जूनचा वेतनाचा प्रश्न अखेर सुटला

मुंबई – राज्यातील एसटी महामंडळाच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांच्या जून महिन्याच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला असून दोन दिवस सुट्टी असल्याने १५ जुलैपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर वेतन जमा होणार आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाला मे महिन्याच्या सवलतमूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी २३०.०६ कोटी रुपये निधी वितरित करण्यास गृह विभागाने मंजुरी दिली आहे. एसटी दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला व […]
आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक !

मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या रविवार १४ जुलै रोजी मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर आज आणि उद्या मध्यरात्री चार तासांचा मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे- दिवा पाचव्या सहाव्या मार्गिकेवर,तर हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी अप आणि डाउन […]
साताऱ्यात बेंदरासाठी मातीच्या बैलांचे रंगकाम अंतिम टप्प्यात

सातारा- बळी राजाचा जिव्हाळ्याचा सण हा बेंदूर समजला जातो. या सणा दिवशी घरातील बैलाला सजवून त्याची पूजा करून त्याला गोडधोड खायला दिले जाते.त्यानिमित्त सातारा शहरात मातीच्या बैलाच्या जोड्या बनवण्याच्या कामाला वेग आला आहे.शहरातील कुंभारवाड्यात या बैलांना रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वास्तविक ग्रामीण भागात खराखुर्या बैलाची पूजा केली जाते. परंतु शहरात मात्र माती आणि […]
सँडहर्स्ट रोड स्टेशनला’पीर सय्यद शहा’ नाव द्या

मुंबई – मुंबईतील सात लोकल रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे.यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाचे नाव डोंगरी रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे.मात्र डोंगरीतील मुस्लीम रहिवाशांनी या नावाला विरोध करीत या स्थानकाला बाबा अब्दुल रेहमान शहा असे नाव देण्याची मागणी केली आहे.१० जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ […]
इचलकरंजी शहरात भटक्या घोड्यांचा वाहतुकीला अडथळा

इचलकरंजी- शहरातील रस्त्यांवर आता भटकी कुत्री आणि गायींपाठोपाठ आता भटके घोडे दिसू लागले आहेत. रस्त्यावर कळपाने फिरणाऱ्या या घोड्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. इचलकरंजी शहरातील राधाकृष्ण चौक,कापड मार्केट परिसर तसेच स्टेशनकडे जाणार्या रस्त्यावर भटक्या घोड्यांचा कळप वावरताना दिसत आहे.गेल्या १० ते १२ दिवसांपासून फिरणारा हा कळप वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. या कळपामध्ये […]
वारीमध्ये अश्व अंगावर पडून मुक्त छायाचित्रकाराचा मृत्यू

माळशिरस – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पुरंदवडे येथील पहिल्या गोल रिंगणात अश्व अंगावर पडल्याने एका मुक्त छायाचित्रकाराचा मृत्यू झाला.कल्याण चट्टोपाध्याय असे मृत्यू झालेल्या छायाचित्रकाराचे नाव असून ते पश्चिम बंगालचे रहिवाशी होते. याप्रकरणी अकलूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. छायाचित्रकार चटोपाध्याय हे पश्चिम बंगालमधून वारीची छायाचित्र टिपण्यासाठी गुरुवारी आले होते.रिंगण सुरू असताना […]
नाशिक-मुंबई महामार्गावर अपघातात ४ जण ठार

नाशिक – नाशिक- मुंबई महामार्गावरील आडगावमध्ये मारुती ब्रिझा व आयशर ट्रकच्या समोरासमोरील धडकेत काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये मारुती कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे एक आयशर ट्रक हा खत घेऊन जात होता. हा ट्रक १२ जुलैला रात्री ११ च्या सुमारास नाशिक आडगाव मुंबई महामार्गाने विरुद्ध दिशेने जात होता.वेगाने […]
दिव्यातील डम्पिंग ग्राऊंड पूर्णतः बंद करा! अन्यथा जनआंदोलन

ठाणे- जिल्ह्यातील दिवा डम्पिंग बंद केले असल्याने महापालिका प्रशासनाने जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात दिवा-शीळ मुख्य रस्त्यात कचरा टाकणे सुरूच आहे.ही दिव्यातील नागरिकांची घोर फसवणूक आहे.तरी याठिकाणी कचरा टाकणे बंद करा, अन्यथा दिवावासियांच्यावतीने पालिका प्रशासनाविरोधात जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. रोहिदास मुंडे यांनी म्हटले […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ रेल्वे गाड्यांना कुठेच थांबा नाही

सावंतवाडी- कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १५ सुपरफास्ट एक्सप्रेस रत्नागिरीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेच थांबत नाहीत.त्यातच आता काल शुक्रवारपासून सुरू झालेल्या मडगाव-चंदीगड वन वे स्पेशल स्पेशल ट्रेनला या जिल्ह्यात थांबा देण्यात आलेला नाही.त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये नाराजी दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील विलवडे, राजापूरनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीसह वैभववाडी, कुडाळ, सावंतवाडी याठिकाणी सुफरफास्ट रेल्वे गाड्या थांबत नाहीत.काही स्थानकावर दिवा-सावंतवाडी वगळता […]
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण! न्यायालयात आरोपपत्र दाखल

मुंबई- घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीने काल शुक्रवारी अटकेत असलेल्या चार आरोपींविरोधात ३२९९ पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. यात १०२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. या आरोपपत्रात तत्कालीन रेल्वे पोलिस आयुक्त आणि या गुन्ह्यातील संशयित आरोपी कैसर खालिद यांच्या जबाबाचा समावेश असून त्यावरून एसआयटीने खालिद यांची चौकशी केल्याचे स्पष्ट होते. शासन, पोलिस महासंचालक कार्यालयाला विश्वासात न घेता […]
वर्सोवामध्ये नवीन मासेमारी बंदर! ४९८.१५ कोटींचा प्रस्ताव मंजूर

मुंबई- वर्सोवा येथे नवीन मासेमारी बंदर उभारले जाणार आहे.महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नव्याने तयार केला आहे.४९८.१५ कोटींचा हा प्रस्ताव केंद्राने दिलेल्या सूचनांची पूर्तता करत आता शेवटच्या टप्प्यात ‘स्टेट एनव्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ॲथॉरिटी’कडे आहे.३ महिन्यांच्या आत हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात येईल,अशी माहिती मत्स्य व्यवसाय विकास मंत्री सुधीर […]
केजरीवालांना अंतरिम जामीन मात्र जेलमधून सुटका नाहीच

नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आजसर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. हा निर्णय अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) केलेल्या अटकेसंबंधी आहे. मात्र केजरीवाल यांना सीबीआयनेही अटक केली असल्याने जामीन मिळाल्यावरही त्यांची तिहार जेलमधून तूर्त सुटका होणार नाही.ईडीने केजरीवाल यांना अटक केली. ईडीच्या या कारवाईला केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले […]
विधान परिषद निवडणुकीत मविआला धक्का काँग्रेसची मते फुटली! जयंत पाटील पराभूत

मुंबई – विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीला एकदा धक्का बसला. अजित पवार आणि शिंदे गटाचे काही आमदार स्वगृही जाण्याच्या तयारीत असून, ते या निवडणुकीत रंग दाखवतील हा दावा फोल ठरला. उलट काँग्रेसचेच 5 आमदार फुटले. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेेदवार विजयी झाले. तर उबाठा […]
