केंद्र सरकारकडून ३५ रुपये दराने कांदा विक्री सुरु

नवी दिल्ली – कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतीपासून सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ३५ रुपये किलोने कांदा देण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकार नॅशनल को ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स युनियन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मोबाईल व्हॅन आणि रिटेल आउटलेटद्वारे कांदा विकणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद […]

दिव्यांगांना एसटीच्या बसमध्ये कायमस्वरूपी आरक्षित आसन

मुंबई – दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी होणार आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक परिपत्रक काढून एसटीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस मध्ये दिव्यांगांना आरक्षण आसने निश्चित केलेली आहेत. साध्या बसपासून शिवनेरी बसेसपर्यंत दिव्यांग प्रवाशांना प्रवासाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांचे आरक्षित आसन […]

नागपुरात भरधाव बसची ट्रकला धडक ! चार ठार

नागपूर- भिवापूर रोडवर आज भरधाव खासगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यात चार जणांचा मृत्यू झाला, तर १० पेक्षा जास्त जण जखमी आहेत.ट्रकला धडक दिल्यानंतर बस हॉटेलमध्ये घुसली. त्यामुळे हॉटेलचेही मोठे नुकसान झाले. अपघात इतका भीषण होता की, बसच्या समोरील बाजूचा चेंदामेंदा झाला. या अपघातात स्थानिक लोकांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत बचावकार्य […]

केजरीवाल यांना जामीन नाहीच सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला

नवी दिल्ली – कथित दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात आजही निर्णय होऊ शकला नाही. दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला.केजरीवाल यांनी न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. एका याचिकेद्वारे त्यांनी सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान दिले आहे. तर दुसऱ्या याचिकेत जामिनावर मुक्त करण्याची विनंती केली आहे.केजरीवाल यांच्या […]

नवी मुंबई मेट्रोदरात ३३ टक्के कपात

नवी मुंबई- सिडकोने नवी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे. सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून ०७ सप्टेंबर २०२४ पासून नवी मुंबई मेट्रो सेवेकरिता सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरांनुसार तिकिटाचा किमान दर १० रुपये व कमाल दर ३० रुपये असणार […]

शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण

मुंबई – शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी घसरणीसह बंद झाले.बँक निफ्टीत किंचित वाढ झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात वाढ झाली.सेन्सेक्स १५१ अंकांनी घसरून ८२,२०१ वर बंद झाला. तर निफ्टी ५४ अंकांच्या घसरणीसह २५,१४५ अंकांवर बंद झाला.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र चांगली तेजी […]

दर्शनासाठी ड्रेस कोड बंधनकारकअंधेरीचा राजा मंडळाचा निर्णय

मुंबई – अंधेरी येथील आझादनगर सार्वजनिक ( अंधेरीचा राजा) उत्सव मंडळाने गणेशोत्सवानिमित्त भाविकांसाठी ड्रेस कोड बंधनकारक केला आहे. शॉर्ट कपडे घालणाऱ्या भाविकांना दर्शनासाठी परवानगी नाकारण्यात येणार आहे.अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना मंडळाकडून बाप्पाचे चरण स्पर्श करून दर्शन घेण्यास परवानगी दिली जाते. मात्र या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या महिला भाविकांनी शॉर्ट कपडे घालू नये, ज्या महिला किंवा […]

रवींद्र जडेजाचा भाजपात प्रवेश

अहमदाबादभारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकारणात उडी घेतली असून त्याने सदस्य नोंदणी करुन भाजपामध्ये प्रवेश केला. त्याची पत्नी रिवाबा जडेजा भाजपाची आमदार आहे.भाजपा सदस्यत्वाची नोंदणी मोहिम २ सप्टेंबरपासून सुरू असून आज रिवाबा जडेजाने एक्स हँडलवर नवीन सदस्य म्हणून रवींद्र जडेजाचा फोटो पोस्ट केला. याआधी विधानसभा निवडणुकीत त्याने रिवाबासाठी भाजपाचा प्रचार केला होता. त्याने […]

अंटार्टिकावरील वितळणाऱ्या बर्फाचा नासा रोबोटद्वारे अभ्यास करणार

वॉशिंग्टन – अंटार्टिकावरील बर्फ वितळण्याचा वेग वाढण्यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा करणार आहे.त्यासाठी नासाच्या रॉकेट विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ शास्त्रज्ञांचे पथक यंत्रमानवाच्या साह्याने अंटार्टिकात संशोधन करणार आहे.अंटार्टिकावरील बर्फ वितळण्याचा वेग वाढल्याने समुद्रातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. जागतिक हवामान बदलामुळे हे घडत आहे. अंटार्टिकावर लाखो वर्षांपासून मोठ मोठे हिमखंड आहेत. […]

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री कुलेबा यांचा राजिनामा

किव्ह – युक्रेनवरील रशियाच्या वाढत्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांवर नाराज आहेत.काही मंत्र्यांची उचलबांगडी होण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.युक्रेनवर रशियाने केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यांत सात नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये संताप व्यक्त होत आहे. झेलेन्स्की या महिन्यात अमेरिकेच्या […]

ग्रेटा थनबर्गला अटकस्टॉक

होम – स्वीडनमधील पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांना कोपनहेगन विद्यापीठात निषेध आंदोलनादरम्यान आज पोलिसांनी अटक केली.इस्राईलकडून गाझा पट्टी आणि वेस्ट बँकवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ थनबर्ग विद्यापीठात आंदोलन करीत होत्या. इस्रायलशी संलग्न अभ्यासक्रम विद्यापीठाने बंद करावा अशी मागणी त्या करीत आहेत.इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करीत थमबर्ग यांनीच अटक झाल्याची माहिती दिली. सोशल मीडियावर या व्हिडिओवरून पोलिसांवर […]

कोणत्याही बँकेतून पेन्शन मिळणार

नवी दिल्ली – कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतंर्गत पेन्शन मिळणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना १ जानेवारी २०२५ पासून कोणत्याही भागातील कोणत्याही बँक शाखेतून पेन्शन काढता येईल. त्यामुळे पेन्शनसाठी ठराविक एका बँकेत ताटकळत राहावे लागणार नाही. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया यांनी ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारला सेंट्रलाइज्ड पेन्शन […]

मुख्यमंत्री स्टॅलीन यांनी अमेरिकेत चालविली सायकल

चेन्नई – तामिळनाडूचे ७१ वर्षांचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी अमेरिकेच्या शिकागो शहरात स्वतः सायकल चालवितानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला.या व्हिडिओवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रतिक्रिया देताना म्हणाले ब्रदर , कधीतरी चेन्नईत दोघे सायकल चालवूया .स्टॅलीन यांचा द्रमुक पक्ष काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. काँग्रेस आणि […]

नरेंद्र मोदी सिंगापूरच्या संसदेत महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षरी

सिंगापूर – सिंगापूर दोर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरच्या संसदेला भेट दिली. त्यावेळी सिंगापूरच्या पंतप्रधान लॉरेन्स वँग यांनी त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी यांनी लॉरेन्स वँग यांना सांगितले की, “तुम्ही पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर ही माझी पहिली भेट आहे. सिंगापूर हा केवळ मित्र देश नाही तर प्रत्येक विकसनशील देशासाठी प्रेरणा आहे. आम्हाला भारतातही अनेक सिंगापूर […]

पूजा खेडकरला अटकेपासून २६ सप्टेंबरपर्यंत संरक्षण

नवी दिल्ली – चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे यूपीएससीची परीक्षा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला किंचित दिलासा दिला. त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत अटक करू नये आणि याप्रकरणी १० दिवसांत सविस्तर तपास करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होणार आहे.पुजा खेडकर यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही अजब दावे केले […]

राजस्थानच्या पोलीस दलात महिलांना ३३ टक्के आरक्षण

जयपूर – राजस्थान पोलीस दलाच्या दुय्यम सेवा विभागात भरतीमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. राजस्थानचे कायदा मंत्री जोगाराम पटेल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राजस्थानच्या पोलीस दलात महिलांचे प्रतिनिधित्व वाढणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय उपयुक्त ठरणार […]

चार-पाच मुले जन्माला घाला! पोप फ्रान्सिस यांचा अजब सल्ला

जकार्ता – इंडोनेशियात बहुतांश दाम्पत्यांना चार-पाच मुले असतात. याबद्दल पोप फ्रान्सिस यांनी इंडोनेशियाच्या नागरिकांचे कौतूक केले.जास्त मुले जन्माला घालण्याची परंपरा अशीच सुरू ठेवा,असा सल्लाही दिला. तुमच्या देशात बहुतांश दाम्पत्यांना चार ते पाच मुले असतात. हे खरेतर संपूर्ण जगाने अनुकरण करावे असे आदर्श उदाहरण आहे. काही देशांत दाम्पत्यांना स्वतःची मुले असण्यापेक्षा कुत्रा किंवा मांजर पाळावेसे वाटते. […]

मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली बैठक यशस्वी! वेतनवाढीनंतर एसटी कामगारांचा संप मागे

मुंबई- गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी काल पुकारलेला संप आज कामगार संघटनांबरोबर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीनंतर मागे घेतला. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ करण्यासह काही मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. त्यामुळे एसटी कामगारांनी संप मागे घेण्याची घोषणा केली.मात्र एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाची कर्मचार्यांची मागणी यावेळीही पूर्ण झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना […]

‘लाडकी बहीण’ योजनेवर अजित पवारांचा दावा! जाहिरात-पोस्टरवरून ‘मुख्यमंत्री’ शब्द काढला

मुंबई- आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महायुती सरकारमधील सगळेच घटक पक्ष सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जोरजोरात प्रचार करत आहेत. महिलांना आकर्षित करण्यासाठी हा आटापिटा सुरू असताना या योजनेच्या श्रेयावरून महायुतीतील पक्षांतच चुरस लागली आहे. अजित पवारांनी या योजनेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे योजनेच्या व्हिडिओ आणि जाहिरातीतून त्यांनी सरळ ‘मुख्यमंत्री’ हा शब्दच काढून टाकला आहे.राष्ट्रवादी […]

शब्दही हिंदू-मुस्लीम? ‘शाही’ इस्लामी! ‘राजसी’ वापरा

उज्जैन- मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील प्रसिध्द महाकाल मंदिराच्या बाबा महाकाल यांच्या मिरवणुकीबाबत एक वेगळा वाद रंगला आहे. अकराशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मिरवणुकीला आजपर्यंत ‘शाही सवारी’ असे म्हटले जात होते. मात्र मध्य प्रदेशमधील साधु-संत, इतिहासकार आणि भाजपा नेते यांनी आता शब्दांमध्येही हिंदू मुस्लिम असा भेद आणून वादंग निर्माण केला आहे. त्यांनी आता ‘शाही ‘या शब्दावरच आक्षेप […]