Home / अर्थ मित्र / MCX ट्रेडिंगची वेळ बदलली; रात्री ११.३० पर्यंत करता येणार ट्रेडिंग

MCX ट्रेडिंगची वेळ बदलली; रात्री ११.३० पर्यंत करता येणार ट्रेडिंग

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच MCX ट्रेडिंगची आजपासून म्हणजेच 14 मार्चपासून वेळ बदलण्यात आली आहे. बदललेल्या वेळेनुसार यापुढे आता...

Social + WhatsApp CTA

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच MCX ट्रेडिंगची आजपासून म्हणजेच 14 मार्चपासून वेळ बदलण्यात आली आहे. बदललेल्या वेळेनुसार यापुढे आता सकाळी ९ ते रात्री ११.३० पर्यंत ट्रेडिंग करता येणार आहे.

सकाळी 9 वाजल्यापासून आंतरराष्ट्रीय संदर्भातील नॉन ऍग्री कमोडिटीज आणि ऍग्री कमोडिटीज (कापूस, सीपीआय आणि कापूस)ट्रेडिंग सुरू होईल. तर नॉन ऍग्री कमोडिटीजची खरेदी-विक्री रात्री 11.30 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच ऍग्री कमोडिटीजची खरेदी-विक्री रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, क्लायंट कोड मॉडिफिकेशन सत्र संबंधित कमोडिटीजसाठी ट्रेडिंग संपल्यानंतर लगेच सुमारे 15 मिनिटांसाठी होईल.

दरम्यान, बीएसईवर आज MCX चे शेअर्स वधारले होते. सकाळी 9.24 च्या सुमारास हा शेअर 36.15 रुपये किंवा 2.6 टक्क्यांच्या वाढीसह 1425 रुपये प्रति शेअरवर ट्रेड करत होता. एकेकाळी तो 1428.25 रुपये प्रति शेअरचा उच्चांक गाठला होता.

Web Title:
संबंधित बातम्या