Home / अर्थ मित्र / संरक्षण क्षेत्रासाठी पहिला म्युच्युअल फंड बाजारात येणार, HDFC कडून हालचाली सुरू

संरक्षण क्षेत्रासाठी पहिला म्युच्युअल फंड बाजारात येणार, HDFC कडून हालचाली सुरू

मुंबई – देशातील संरक्षण क्षेत्रातील पहिला म्युच्युअल फंड बाजारात आणण्यासाठी एचडीएफसी म्युच्युअल फंडने अर्ज केला आहे. डिफेन्स फंड संरक्षण क्षेत्रातील हा पहिलाच असा फंड असेल. सेबीने मंजुरी दिल्यानंतरच हा फंड एचडीएफसीला बाजारा आणता येणार आहे.

एचडीएफसी डिफेन्स फंडासाठी सेबीकडे स्कीम इन्फर्मेशन डॉक्युमेंट दाखल केले आहे. यानुसार, यामध्ये संरक्षण आणि संलग्न क्षेत्रातील कंपन्या यामध्ये गुंतवणूक करू शकतील. ही योजना मार्केट कॅप्स असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल आणि कंपन्या ओळखण्यासाठी बॉटम-अप अॅक्सेसचा वापर करेल. निफ्टी इंडिया डिफेन्स इंडेक्सने चार वर्षांत 25 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे एचडीएफसी म्युच्युअल फंडाचा डिफेन्स फंड ही जोरदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा देशांतर्गत संरक्षण कंपन्यांना होणार आहे.

संरक्षण क्षेत्रात भांडवल उभारण्यासाठी म्युच्युअल फंड नवनवे फंड काढत असून हा फंड केवळ संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल. संलग्न क्षेत्रातील एअरोस्पेस, स्फोटक, जहाजबांधणी, एसआयडीएम (सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स) यादीतील उद्योग/समभाग किंवा संरक्षण क्षेत्राशी संलग्न अन्य तत्सम उद्योग/ समभागांचा समावेश आहे.