Home / Top_News / युरोप खंडात उष्णतेची लाट कायम ग्रीसमधील जंगलात वणवा पेटला

युरोप खंडात उष्णतेची लाट कायम ग्रीसमधील जंगलात वणवा पेटला

अथेन्सफ्रान्स, स्पेन, पोलंड, ग्रीससह युरोप खंडातील अन्य देशांत उष्णतेची लाट कायम आहे. या देशांमध्ये 40 ते 45 अंशांदरम्यान तापमान नोंदवले...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

अथेन्स
फ्रान्स, स्पेन, पोलंड, ग्रीससह युरोप खंडातील अन्य देशांत उष्णतेची लाट कायम आहे. या देशांमध्ये 40 ते 45 अंशांदरम्यान तापमान नोंदवले गेले आहे. या उष्णतेमुळे ग्रीसमधील जंगलात वणवा पेटला आहे. आतापर्यंत या वणव्यात जवळपास 35 किलोमीटरवरील जंगल जळून खाक झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नामुळे बुधवारी रात्री हा वणवा विझण्याच्या मार्गावर होता. मात्र गुरुवारी जोरदार वारे वाहिल्यामुळे हा वणवा पुन्हा भडकला. ग्रीसच्या अग्निशमन दलाचे प्रवक्ते यिआनिस आर्टोपोइस यांनी सांगितले की, आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या 24 तासांत जंगलातील 62 ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. ग्रीसच्या पश्चिम अट्टिका परिसरातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. काही लोक प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत. आदेश देऊनही लोक आपली घरे सोडण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
अमेरिकेतही उष्णतेमुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. उष्णतेमुळे फ्लोरिडा, कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टनसह 15 राज्यांतील 11 कोटींवर लोक उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या