Home / महाराष्ट्र / वाशीममध्ये पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

वाशीममध्ये पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान

वाशिम – वाशीम जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २,६७१.८५ हेक्टरवरील...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

वाशिम –

वाशीम जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २,६७१.८५ हेक्टरवरील सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील खिर्डा व पोहा येथील १३.८ हेक्टर आणि मालेगाव येथील पाच हेक्टर अशी एकूण १९.१ हेक्टर शेत जमीन खरवडली आहे. मानोरा तालुक्यात ८८७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान कारंजा तालुक्यातील उकर्डा, पानगव्हाण, काजळेश्वर, पलाना परिसरात मुसळधार पावसामुळे उमा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदी-नाल्यांच्या पाण्यामुळे झाल्याने नदीकाठचा परिसर जलमय झाला होता.

Web Title:
संबंधित बातम्या