Home / Top_News / मराठवाड्यामध्ये पावसासाठी मुस्लिम बांधवांचे नमाज पठण

मराठवाड्यामध्ये पावसासाठी मुस्लिम बांधवांचे नमाज पठण

छत्रपती संभाजीनगर – राज्यातील मराठवाड्यात आतापर्यंतच्या पूर्ण पावसाळा हंगामात कुठेच दमदार पाऊस पडलेला नाही.आता तर पावसाने दडी मारल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या...

By: E-Paper Navakal

छत्रपती संभाजीनगर – राज्यातील मराठवाड्यात आतापर्यंतच्या पूर्ण पावसाळा हंगामात कुठेच दमदार पाऊस पडलेला नाही.आता तर पावसाने दडी मारल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे लवकर पाऊस पडावा म्हणून येथील ईदगाहमध्ये विशेष नमाज पठण करण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधवांनी ‘गरज-बरस प्यासी धरती पर फिर पानी दे मौला’ या निदा फाजली यांच्या ओळींचा आधार घेत चांगला पाऊस पडू दे अशी दुआ अल्लाहकडे केली.

शुक्रवारी शहरातील जुमाच्या नमाजावेळी विविध मशिदीत छावणी ईदगाह येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक मुस्लिम बांधव याठिकाणी नमाजसाठी एकत्र आले होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष नमाजला सुरुवात झाली. मौलाना मुफ्ती मोहम्मद मोईजूद्दिन कासमी यांनी दुआ केली.यावेळी नमाज पठण करण्यात आले. या नमाजसाठी मौलाना मनसफखा कासमी, इलियास फलाही तसेच जामा मशिदीचे इमाम मौलाना हाफिज जाकीर आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title:
संबंधित बातम्या