Home / News / केदारनाथजवळ बर्फाचा मोठा कडा कोसळला

केदारनाथजवळ बर्फाचा मोठा कडा कोसळला

रुद्रप्रयाग – केदारनाथ धामच्या मागे सुमारे चार किलोमीटर उंचीवर असलेल्या गांधी सरोवर परिसरात काल भल्या पहाटे बर्फाचा एक मोठा कडा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

रुद्रप्रयाग – केदारनाथ धामच्या मागे सुमारे चार किलोमीटर उंचीवर असलेल्या गांधी सरोवर परिसरात काल भल्या पहाटे बर्फाचा एक मोठा कडा कोसळला. ही घटना केदारनाथ यात्रेवर आलेल्या भाविकांनी आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये चित्रित केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही.
काल पहाटे पाच वाजताच्या सुमारास भूस्खलन होऊन हा भला मोठा हिमकडा कोसळून प्रचंड वेगाने खाली घसरत खोल दरीत जाऊन कोसळला. केदारनाथ धामपासून वरच्या बाजूला असलेल्या मेरू-सुमेरू पर्वत रांगांमध्ये बर्फाच्छादित कडे दरवर्षी पावसाळ्यात कोसळतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
सन २०२२ मध्ये या परिसरात सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात हिमकडे कोसळण्याच्या तीन घटना घडल्या होत्या. मे आणि जून २०२३ मध्ये छोराबारी ग्लेशियरमध्ये हिमकडे कोसळण्याच्या पाच घटना घडल्या होत्या.
भूस्खलनाच्या या घटनांनंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंगच्या शास्त्रज्ञांनी या परिसरावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. या परिसराचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले असून या ठिकाणी होणाऱ्या भुस्खलनाच्या घटना सामान्य आहेत असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Web Title:
संबंधित बातम्या