Home / News / ताडोबा प्रकल्प तीन महिने बंद शेवटच्या दिवशी झाले व्याघ्र दर्शन

ताडोबा प्रकल्प तीन महिने बंद शेवटच्या दिवशी झाले व्याघ्र दर्शन

चंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत क्षेत्र पुढील तीन महिन्यांसाठी पर्यटकांना बंद करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी सोनम...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत क्षेत्र पुढील तीन महिन्यांसाठी पर्यटकांना बंद करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी सोनम वाघीण व तिच्या ३ बछड्यांनी पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिल्यामुळे पर्यटकांचा हा शेवटचा दिवस सार्थकी लागला.
चंद्रपूर येथील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत क्षेत्र म्हणजे कोअर भागात १ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात पर्यटन बंद केले जाते. या भागातील रस्ते पावसाने निसरडे झाले आहेत . त्याचप्रमाणे प्राण्यांचा प्रजननाचा मोसम असल्याने त्यांना त्रास होऊ नये यासाठी हे पर्यटन बंद ठेवले जाते. व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या अनेक पर्यंटकांना त्याची महिती असल्याने ते शेवटच्या आठवड्यात व त्यातही शेवटच्या दिवशी इथे मोठ्या संख्येने गर्दी करतात. शेवटच्या दिवशी तरी व्याघ्र दर्शन व्हावे ही अनेक पर्यटकांची इच्छा काल सोनम वाघीणीने व तिच्या बछड्यांनी पूर्ण केली. आता हा व्याघ्र प्रकल्प १ ऑक्टोबर पासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या