Home / News / व्यावसायिक गॅस सिलिंडर३० रूपयांनी स्वस्त

व्यावसायिक गॅस सिलिंडर३० रूपयांनी स्वस्त

नवी दिल्ली देशातील प्रमुख शहरांमध्ये आज व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३० रुपयांनी कमी झाल्या. आज तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली

देशातील प्रमुख शहरांमध्ये आज व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती ३० रुपयांनी कमी झाल्या. आज तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १५९८ रुपयांना तर दिल्लीत १६४६ रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १६७६ रुपयांना मिळत होता. याशिवाय कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर १७५६ रुपयांना झाला असून याआधी त्याची किंमत १७८७ रुपये होती. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Web Title:
संबंधित बातम्या