Home / News / कोयनेची पाणीपातळी वाढली! नदीकाठच्या गावांना इशारा

कोयनेची पाणीपातळी वाढली! नदीकाठच्या गावांना इशारा

कराड- सध्या पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कराड- सध्या पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत कोयना नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय २ टीएमसी वाढ झाली आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून कोयनानगर भागात जोरदार पावसाने सुरुवात केली आहे. परिसरातील ओढ्या नाल्यांचे पाणी वाढल्याने कोयना,केरा,मोरणा,काजळी,काफना आणि उत्तरमांड या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. महाबळेश्वर परिसरातही गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे .

Web Title:
संबंधित बातम्या