Home / News / कास – बामणोली रस्ता पाण्यात वाहतूक घाटाईमार्गे वळवली

कास – बामणोली रस्ता पाण्यात वाहतूक घाटाईमार्गे वळवली

कराड- सातारा जिल्ह्यातील कास-बामणोली हा कास पठाराकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक घाटाईमार्गे वळवण्यात आली...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कराड- सातारा जिल्ह्यातील कास-बामणोली हा कास पठाराकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक घाटाईमार्गे वळवण्यात आली आहे.तर मागील दोन दिवस पडलेल्या पावसामुळे कास तलाव पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे.

कास परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.कास तलावाची एकूण पाणी पातळी २२ मीटर उंच इतकी आहे.तर सध्याची पाणीपातळी ही २१ मीटर एवढी आहे.पावसाचा जोर वाढला तर पुढील दोन दिवसांत धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.याच तलावाच्या पाण्यामुळे कास- बामणोली रस्ता पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे कास पठाराकडे जाणारी वाहतूक बंद पडली आहे.या मार्गावरील सर्व वाहतूक घाटाईमार्गे वळविण्यात आली आहे.पर्यटकांना याची माहिती कळावी म्हणून कास रस्ता बांबूंचे बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या