Home / News / इराणमध्ये कट्टरपंथी जलील पराभूत मसूद पेजेश्कियान नवे राष्ट्राध्यक्ष

इराणमध्ये कट्टरपंथी जलील पराभूत मसूद पेजेश्कियान नवे राष्ट्राध्यक्ष

तेहरान – इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमध्ये दुसर्‍या टप्प्याच्या थेट...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

तेहरान – इराणमध्ये अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मतदानात आघाडीवर असलेल्या दोन उमेदवारांमध्ये दुसर्‍या टप्प्याच्या थेट लढतीत सुधारणावादी नेते ६९ वर्षीय मसूद पेझेश्कियान यांनी कट्टरपंथी उमेदवार सईद जलिली यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. इराणमध्ये गेल्या महिन्यात हेलिकॉप्टर अपघातात राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्यानंतर पेझेश्कियान आणि जलिली यांच्यात थेट लढतीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. यात पेजेश्कियान यांना १६.३ दशलक्ष मतांनी विजयी घोषित करण्यात आले. जलिली यांना केवळ १.३५ दशलक्ष मते मिळाली.

यापूर्वी, २८ जून रोजी झालेल्या मतदानाच्या सुरुवातीच्या फेरीत कोणत्याही उमेदवाराला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली नव्हती, त्यामुळे आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये काल थेट लढत झाली. पेजेश्कियानची आघाडी बळकट झाल्यामुळे, त्यांच्या समर्थकांनी तेहरान आणि देशातील इतर शहरांमध्ये रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा केला.

हृदयरोगतज्ज्ञ मसूद हे अमेरिकेबरोबरचा अणुकरार पुन्हा प्रस्थापित करण्याच्या आणि पाश्चात्य देशांशी संबंध सुधारण्याच्या बाजूने आहेत. ते पुन्हा राष्ट्रपती झाल्याने या प्रयत्नांना पुन्हा वेग मिळण्याची शक्यता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या