Home / News / इंग्लंड, नेदरलॅंड फूटबाॅल सामन्यात प्रिंस विल्यम्स उपस्थित राहणार नाही

इंग्लंड, नेदरलॅंड फूटबाॅल सामन्यात प्रिंस विल्यम्स उपस्थित राहणार नाही

लंडन- इंग्लंडचे फुटबॉल प्रेम जगात प्रसिद्ध आहे. त्यातून बकिंमगहॅम पॅलेस हे इंग्लंडच्या राजघराण्याचे निवासस्थानही सुटलेले नाही. सध्या इंग्लंडमध्ये फुटबॉलचा ज्वर...

By: E-Paper Navakal

लंडन- इंग्लंडचे फुटबॉल प्रेम जगात प्रसिद्ध आहे. त्यातून बकिंमगहॅम पॅलेस हे इंग्लंडच्या राजघराण्याचे निवासस्थानही सुटलेले नाही. सध्या इंग्लंडमध्ये फुटबॉलचा ज्वर चढला असतांना भावी राजा प्रिंस विल्यम्स इंग्लंड विरुद्ध नेदरलॅंड या युरो कप २०२४ च्या उपांत्य फेरीच्या सामन्याला उपस्थित राहणार नाही. बकिंगहॅम पॅलेसने ही माहिती दिली आहे.

इंग्लंडच्या फुटबॉल ज्वराचा मोठा पुरावा काल बकिंगहॅम पॅलेसमध्ये पाहायला मिळाला. राजमहालाच्या बाहेरच्या सुरक्षा रक्षकांची ड्युटी बदलण्याच्या प्रक्रियेत यावेळी फुटबॉल ही थिम वापरण्यात आली होती. याद्वारे इंग्लंडच्या फुटबॉल संघाला शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतर प्रसिध्द केलेल्या निवेदनात बकिंगहॅम पॅलेसने प्रिंस विल्यम्स उपस्थित राहणार नसल्याचे सांगितल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. प्रिंस विल्यम्सही इतर ब्रिटीश लोकांप्रमाणे फुटबॉल चा जबरदस्त फॅन आहे. युरो कप सुरु झाल्यापासून त्याने जर्मनीत इंग्लंडच्या व इतर अनेक सामन्यांना हजेरी लावली होती. त्यामुळे उपांत्य फेरीच्या सामन्यालाही तो हजेरी लावेल अशी शक्यता असतांना बकिंगहॅम पॅलेसने तो उपस्थित राहणार नसल्याचे कळवले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या