Home / News / जायकवाडी धरणात अद्याप अवघा ४ टक्के पाणीसाठा

जायकवाडी धरणात अद्याप अवघा ४ टक्के पाणीसाठा

छत्रपती संभाजीनगर- संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा जलसाठा उन्हाळ्यात खालावला होता. पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला...

By: E-Paper Navakal

छत्रपती संभाजीनगर- संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या पैठणच्या जायकवाडी धरणाचा जलसाठा उन्हाळ्यात खालावला होता. पावसाळा सुरु होऊन दीड महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्याप धरणातील जलसाठा वाढला नसून सध्या तो फक्त ४ टक्के इतका आहे.गेल्या वर्षी याचदिवशी जलसाठा २६.९३ टक्के इतका होता.

मराठवाड्यातील प्रमुख धरण असलेले जायकवाडी धरण मागील वर्षीच्या पावसातही पूर्ण भरले नव्हते. पाऊस कमी झाल्याने धरणात पुरेसा पाणीसाठा जमा होऊ शकला नव्हता. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीषणता अधिक प्रमाणात जाणवली होती.या धरणाच्या पाण्याचे देखील उन्हाच्या तीव्रतेने बाष्पीभवन होऊनदेखील पाणीसाठा कमी झाला होता.उन्हाळ्यात हा पाणीसाठा २ टक्क्यांवर आला होता.जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसाने या धरणाचा पाणीसाठा ४ टक्के झाला होता.

Web Title:
संबंधित बातम्या
To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.