Home / News / सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ मुंबईतील पाणीसंकट दूर होणार

सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ मुंबईतील पाणीसंकट दूर होणार

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईचे पाणीसंकट दूर होण्याची चिन्हे आहेत.मुंबई महानगर पालिकेने...

By: E-Paper Navakal

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईचे पाणीसंकट दूर होण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांमधील पाणीसाठा 5,08,108 दशलक्ष लिटर इतका झाला आहे. म्हणजेच या धरणांमध्ये एकूण 35.11 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. काल सातही धरणात 30 टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत आज पाणीसाठ्यात 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या 5 धरण आणि 2 तलावांमधून पाणी पुरवठा केला जातो. या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या या सातही धरणांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. या धरणांमधून मुंबईला दररोज 3 हजार दशलक्ष लिटर पाणीपुरववठा केला जातो.
गेल्या महिन्यात धरणातील पाणीसाठ्यात घट झाल्यामुळे मुंबईत 10 टक्के पाणीकपात करण्यात आली होती. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे मुंबईवर असलेले पाणीकपातीचे संकट दूर होण्याची शक्यता आहे.

Web Title:
To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.