Home / News / रानसई धरण तुडुंब भरले! उरणकरांचा पाणीप्रश्न मिटला

रानसई धरण तुडुंब भरले! उरणकरांचा पाणीप्रश्न मिटला

उरण- मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे.त्यामुळे उरणकरांचा पाणीप्रश्न मिटला...

By: E-Paper Navakal

उरण- मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे.त्यामुळे उरणकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे.या धरणाची पाणीपातळी ११६.५ फूट इतकी झाली आहे.

एमआयडीसी उरण कार्यालयाचे उपअभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी सांगितले की,काल सोमवारी १५ जुलै रोजी सकाळी ११.४५ वाजता रानसई धरण ओसंडून वाहायला सुरुवात झाली.गेल्या वर्षी हे धरण १८ जुलैला ओसंडून वाहू लागले होते.यंदा पावसाचा पहिला जून महिना काहीसा कोरडाच गेल्याने हे धरण अद्याप भरले नव्हते. या धरणाची उंची १२० फूट असली तरी धरणाची पाणीपातळी ११६.६ फूट झाली की हे धरण ओव्हरफ्लो होते.अर्ध्या उरण तालुक्याची तहान या धरणाच्या पाण्यावर भागविली जाते.या धरणातून उरण नगरपरिषद, तालुक्यातील २१ गावे आणि ओएनजीसी,एनएडी आणि जीटीपीएस या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो.

Web Title:
संबंधित बातम्या