Home / News / राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी दोन आठवड्यानंतर

राष्ट्रवादी पक्ष चिन्हाबाबतची सुनावणी दोन आठवड्यानंतर

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आता...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्यांचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी आता दोन आठवड्यानंतर ६ ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणी दोन आठवड्यात लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना दिले.

शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांनी वेगळा गट स्थापन केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवारांना बहाल केले. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान अजित पवारांना दोन आठवड्यात उत्तर द्यायला सांगितले आहे. अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवारांना प्रतिपक्ष करायचा असेल तर एका आठवड्यात शरद पवारांनी अर्ज दाखल करावा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा मूळ पक्ष व घड्याळ हे चिन्ह अजित पवारांच्या ताब्यात आहे. शरद पवारांना निवडणूक आयोगाने नव्या पक्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव तसेच तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या पक्षाला निधी गोळा करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शरद पवार गटाला काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव तसेच तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वापरूनच लढवावी लागण्याची शक्यता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या