Home / News / चार वर्षानंतर पहिल्यांदा जम्मू सीमेवर लष्कर तैनात

चार वर्षानंतर पहिल्यांदा जम्मू सीमेवर लष्कर तैनात

श्रीनगर- पाकिस्तानजवळील जम्मू सीमेवर तब्बल चार वर्षांनंतर पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलासोबत लष्कराचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.२०२० मध्ये चीनसोबतच्या संघर्षानंतर...

By: E-Paper Navakal

श्रीनगर- पाकिस्तानजवळील जम्मू सीमेवर तब्बल चार वर्षांनंतर पहिल्यांदाच सीमा सुरक्षा दलासोबत लष्कराचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.२०२० मध्ये चीनसोबतच्या संघर्षानंतर जवानांना जम्मू भागातून हटवून लडाखमध्ये नियंत्रण रेषा भागात पाठवण्यात आले होते.सध्या तरी त्याठिकाणी जवान तैनात केले जाणार नाहीत.परंतु जम्मूमध्ये दोन-तीन दिवसांत अतिरिक्त जवान तैनात केले जातील.या भागात काही जवान आधीपासून आहेत.त्यांना सीमेवर पाठवण्यात आले आहे. जम्मू भागात जवानांची संख्या वाढवणे आणि गुप्त माहितीची देवाणघेवाण तत्काळ करण्यासाठी मल्टी एजन्सी सेंटरला विकसित केले जात आहे.दहशतवाद् संपवण्यासाठी खास कमांडोही तैनात केले जात आहेत. कठुआच्या डोंगराळ भागात ८० किमी क्षेत्रात जवान तैनात झाले आहेत.त्यांनी नद्या, पावसाळी नाले, घुसखोरीच्या जुन्या मार्गाची पूर्णपणे नाकेबंदी केली आहे, अशी माहिती शनिवारी जम्मू पोलिस मुख्यालयात लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आली.

Web Title:
संबंधित बातम्या