Home / News / अमेरिकेत मिसिसीपीत अंदाधुंद गोळीबारात ३ ठार! १६ गंभीर

अमेरिकेत मिसिसीपीत अंदाधुंद गोळीबारात ३ ठार! १६ गंभीर

मिसिसिपी- अमेरिकेतील मिसिसिपी येथील नाईट क्लबजवळ एका अज्ञात व्यक्तीने अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात एकूण १९ लोकांना गोळ्या लागल्या, त्यातील...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मिसिसिपी- अमेरिकेतील मिसिसिपी येथील नाईट क्लबजवळ एका अज्ञात व्यक्तीने अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात एकूण १९ लोकांना गोळ्या लागल्या, त्यातील ३ जण ठार, तर १६ जण जखमी झाले. रविवारी स्थानिक वेळेनुसार रात्री एक वाजताच्या सुमारास इंडियनोलातील चर्च स्ट्रीटवरील नाईट क्लबबाहेर ही घटना घडली. गोळीबार करून अज्ञात व्यक्ती फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या गोळीबाराचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.

या घटनेबाबत “इंडियानोलाचे पोलिस प्रमुख रोनाल्ड सॅम्पसन यांनी सांगितले की, या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आणि १६ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरु आहे. या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Web Title:
संबंधित बातम्या