Home / News / १० वर्षांनंतर सिंधुदुर्गात सापडला हत्तीरोगाचा रुग्ण

१० वर्षांनंतर सिंधुदुर्गात सापडला हत्तीरोगाचा रुग्ण

मालवण- सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हत्ती रोगांचा शिरकाव झाला आहे.मालवण तालुक्यात हत्तीरोगाचा रुग्ण सापडला आहे.हा रुग्ण एक महिला...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मालवण- सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० वर्षांनंतर पुन्हा एकदा हत्ती रोगांचा शिरकाव झाला आहे.मालवण तालुक्यात हत्तीरोगाचा रुग्ण सापडला आहे.हा रुग्ण एक महिला असून तिच्यावर आरोग्य विभाग औषधोपचार करत आहे.दरम्यान, हा रुग्ण गेल्या महिन्यात सापडला असून त्यानंतर आतापर्यंत मालवण तालुक्यातून १२३८ जणांचे नमुने घेतले आहेत.

२०१४ मध्ये जिल्ह्यात हत्तीरोगाचा शेवटचा रुग्ण आढळून आला होता. मालवण तालुक्यात त्यावेळी ७१ रुग्ण सापडले होते.पण आरोग्य यंत्रणेने विशेष मोहीम राबवून या रोगावर पूर्णतः नियंत्रण मिळवले होते.२०१४ नंतर एकही रुग्ण सापडला नव्हता.मात्र आता एक रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने या आजाराने
जिल्ह्यात पुन्हा शिरकाव केल्याचे उघड झाले आहे. हत्तीरोग झालेल्या रुग्णाला क्युलेक्स जातीच्या डासाने चावा घेतला आणि तो डास इतरांना चावला तर त्याच्या माध्यामातून हत्तीरोगाचा प्रसार होतो.

Web Title:
संबंधित बातम्या