Home / News / वाळूशिल्पकार सुदर्शन यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली

वाळूशिल्पकार सुदर्शन यांनी राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतली

नवी दिल्ली – वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. १२ जुलैला सेंट पीटर्सबर्ग येथे...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

नवी दिल्ली – वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी आज दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. १२ जुलैला सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धेत सुदर्शन पट्टनाईक यांना सुवर्णपदकासह गोल्डन सँड मास्टर पुरस्कार मिळाल्याबद्दल द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे अभिनंदन केले.सुदर्शन पटनायक यांचा जन्म १५ एप्रिल १९७७ मध्ये ओडिशा येथील पुरीमध्ये झाला. २०१४ मध्ये त्यांना श्री पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते. प्रत्येक खास दिनानिमित्त ते विविध वाळूशिल्प साकारत असतात. तर काही दिवसांपूर्वी सुदर्शन पटनायक यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा महोत्सव २०२४ मध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी घनदाट जंगलात बसलेल्या वाघाचे ५० फूट लांबीचे वाळूचे शिल्प साकारले होते. या साकारलेल्या शिल्पाच्या खाली वाघ वाचवा असा संदेश दिला होता.

Web Title:
संबंधित बातम्या