Home / News / गोव्यात टॅक्सी चालकांची मुजोरी पर्यटकांच्या बसेसची अडवणूक

गोव्यात टॅक्सी चालकांची मुजोरी पर्यटकांच्या बसेसची अडवणूक

मडगाव- गोव्यातील मडगाव आणि परिसरातील टॅक्सी चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.कारण हे टॅक्सी चालक पर्यटक बसेस आणि टेम्पो चालकांची...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मडगाव- गोव्यातील मडगाव आणि परिसरातील टॅक्सी चालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.कारण हे टॅक्सी चालक पर्यटक बसेस आणि टेम्पो चालकांची किनारी भागातील हॉटेल्स पर्यंत जाण्यासाठी अडवणूक करत आहेत.यासंदर्भात बस आणि ट्रॅव्हलर्स मालकांनी काल पोलीस उपअधीक्षकांची भेट घेतली.गरज भासल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही बस आणि ट्रॅव्हलर्स मालकांनी दिला आहे.

टेम्पो ट्रॅव्हलर्सचे मालक किनान सय्यद म्हणाले की, हे टॅक्सी चालक पर्यटक बस व टेम्पो ट्रॅव्हलर्स मोठ्या किनारी भागात पंचतारांकित हॉटेल्समध्ये जाण्यापासून अडवत आहेत.तसेच शिवीगाळ करून मारहाण करण्याच्या आणि गाडी पेटवून देण्याच्या धमक्याही देत आहेत.

राज्यात कुठेही खासगी टॅक्सीना स्टँड हे कायदेशीररीत्या दिलेले नाही.त्यामुळे या विषयावर पोलिसांकडून तोडगा निघाला नाहीतर वाहतुक मंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत.तसेच गरज पडल्यास न्यायालयातही याचिका दाखल करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते पराग रायकर यांनी दिला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या