Home / News / मलेशियातही रंगणार संतनामदेव पालखी सोहळा

मलेशियातही रंगणार संतनामदेव पालखी सोहळा

आळंदी – संत नामदेव महाराजांच्या प्रतिकात्मक चरण पादुका माऊलींच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून काल मलेशियाकडे रवाना झाल्या. १ आणि २...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

आळंदी – संत नामदेव महाराजांच्या प्रतिकात्मक चरण पादुका माऊलींच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून काल मलेशियाकडे रवाना झाल्या. १ आणि २ ऑगस्ट असे दोन दिवस मलेशिय़ामध्ये नामदेव महाराजांचा पालखी सोहळा रंगणार आहे.या सोहळ्यासाठी दिंडीचे हिंगोलीतील नरसी नामदेव येथून काल प्रस्थान झाले.आळंदीत संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधीचे दर्शन आणि नगरप्रदक्षिणा करून ही दिंडी मलेशियाला जाण्यासाठी मुंबई विमानतळाकडे मार्गस्थ झाली.मलेशियात क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भविक निघाले आहेत.मलेशियातील मराठी भाविकही दिंडीत सहभागी होणार आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या