Home / क्रीडा / गोल्डनबॉय नीरज चोप्राभालाफेकीच्या अंतिम फेरीत

गोल्डनबॉय नीरज चोप्राभालाफेकीच्या अंतिम फेरीत

पॅरिस – पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये भारताचा आज गोल्डनबॉय नीरज चोप्रा पात्रता फेरीतच ८९.३४ मीटर इतकी दूर भालाफेक करून अंतिम फेरीसाठी पात्र...

By: E-Paper Navakal

पॅरिस – पॅरिस ऑलिंम्पिकमध्ये भारताचा आज गोल्डनबॉय नीरज चोप्रा पात्रता फेरीतच ८९.३४ मीटर इतकी दूर भालाफेक करून अंतिम फेरीसाठी पात्र ठरला . ८ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत त्याच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. मात्र भारताचाच किशोर जैनाला अपयश आले. दोन्ही प्रयत्नात त्याला ८४ मीटरचे अंतर पार करता आले नाही. त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.मे २००२४मध्ये झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राने ८६.३६ मीटर अंतरावर भाला फेकून पदक जिंकले जिंकले होते. आज त्याने ८४ मीटरहून कितीतरी पुढे म्हणजे ८९ .३४ मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. त्याचा प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तानचा अर्शद नदीम ८६.५९ मीटर भाला फेकून चौथा आला. अंतिम फेरीसाठी नीरज चोप्रासह १२ स्पर्धकांनी पात्र केले आहे. यामध्ये अर्शद नईम ,एडरसन पीटर्स,ज्युलियन वेबर,ज्युलियन एगो,लुईस मेंडीसियो दा सिल्वा, जेकब वार्डलोज ,टोनी करन ,एंड्री यन मारडरे,ऑलिव्हर हेलेन्डर ,केशन वॅलकोट आणि लस्सी एंटलेटालो यांचा समावेश आहे.

Web Title:
संबंधित बातम्या