Home / News / कर्नाटक-गोव्याला जोडणारा जुना काली पूल कोसळला

कर्नाटक-गोव्याला जोडणारा जुना काली पूल कोसळला

बंगळूरू- कर्नाटकातील कारवार आणि गोव्याला जोडणारा सुमारे ४० वर्ष जुना पूल काल मध्यरात्री कोसळला. यावेळी गोव्याहून कारवारच्या दिशेने येणारा ट्रकही...

By: E-Paper Navakal

बंगळूरू- कर्नाटकातील कारवार आणि गोव्याला जोडणारा सुमारे ४० वर्ष जुना पूल काल मध्यरात्री कोसळला. यावेळी गोव्याहून कारवारच्या दिशेने येणारा ट्रकही पुलावरून नदीत पडला. ट्रकचालकाने केबिनवर चढून आपला जीव वाचवला. मच्छीमार आणि स्थानिक पोलिसांनी तत्काळ ट्रकचालक राधाकृष्ण नला स्वामी यांची सुटका केली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. ट्रक नदीत पडण्यापूर्वी किती वाहने नदीपात्रात पडली असावीत, याचा जलतरणपटूंच्या मदतीने पोलिस शोध घेत आहेत.

काली नदीवरील कर्नाटक-गोव्याला जोडणारा पूल ४३ वर्षांपूर्वी बांधला होता. हा पूल तीन टप्प्यांत कोसळला. पूल कोसळल्याच्या घटनेनंतर आज सकाळी गोव्याला जोडणाऱ्या काली नदीवरील आणखी एका खालच्या पुलावरील वाहतूक ठप्प झाली होती. गोव्याला जाण्यासाठी पर्यायी मार्ग असल्याने वाहतुकीची कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. पुलाचा पहिला भाग ट्रकसह नदीत कोसळला, पुलाचे उर्वरित दोन भाग दहा मिनिटांनंतर नदीत कोसळले.

ट्रक चालक बाळू मुरुगन (३७) ड्रायव्हरच्या कॅबिनची काच तोडून ट्रकमधून टपावर चढला. टपावरून त्याने मदतीसाठी आरडाओरडा केली असता महामार्गावरून गस्त घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे त्याच्याकडे लक्ष वेधले. पोलिसांनी तत्काळ ड्रायव्हरची सुटका करून कारवार येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती उत्तर कन्नडा जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त कृष्णा प्रिया यांनी दिली.

Web Title:
To use reCAPTCHA V3, you need to add the API Key and complete the setup process in Dashboard > Elementor > Settings > Integrations > reCAPTCHA V3.