Home / News / आता चिनी तंत्रज्ञांना भारताचा व्हिसा मिळवणे सुलभ होणार

आता चिनी तंत्रज्ञांना भारताचा व्हिसा मिळवणे सुलभ होणार

*विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने पीएलआय योजनांसाठी ‘फास्ट ट्रॅक व्हिसा’ देण्यासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

*विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने पीएलआय योजनांसाठी ‘फास्ट ट्रॅक व्हिसा’ देण्यासाठी विशेष ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.त्यामुळे आता चिनी तंत्रज्ञांना भारताचा व्हिसा मिळवणे सुलभ झाले आहे.
सौर ऊर्जासह अनेक प्रकल्पातील मशिनरी बसविण्यासाठी चिनी तंत्रज्ञांची भारताला आवश्यकता आहे.त्यामुळे आता या तंत्रज्ञांचे भारतात येणे सोपे होणार आहे.

गेल्या आठवड्यापासून
पीएलआय व्हिसा फास्ट ट्रॅक करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे.यामुळे व्हिसा प्रक्रियेला सध्याचा चार-पाच महिन्याचा कालावधी आता ३० दिवसांवर येणार आहे. पीएलआय व्हिसा लवकरात लवकर देण्यासाठी ऑनलाइन पोर्टलच्या कामकाजाची पुरविण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली.गेल्या काही वर्षांपासुन चिनी तंत्रज्ञांना भारताच्या व्हिसासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक करण्यात आली आहे.मात्र विलंब लागत असल्याची तक्रार भारतातील काही कंपन्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. यावर उपाय म्हणून आता ही नवीन विशेष ऑनलाइन पोर्टल सेवा सुरू करण्यात आली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या