Home / News / आता बँक खात्यासाठी ४ नॉमिनी देता येणार!

आता बँक खात्यासाठी ४ नॉमिनी देता येणार!

नवी दिल्ली- देशभरातील बँक खातेदार येत्या काही दिवसांत आपल्या बँक खात्यासाठी चार व्यक्तींची नावे नॉमिनी म्हणून देऊ शकणार आहेत. केंद्रीय...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- देशभरातील बँक खातेदार येत्या काही दिवसांत आपल्या बँक खात्यासाठी चार व्यक्तींची नावे नॉमिनी म्हणून देऊ शकणार आहेत. केंद्रीय अर्थराज्य मंत्री पंकज चौधरी यांनी काल लोकसभेत बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक २०२४ सादर केले आहे.त्यामध्ये बँक खातेधारकांना चार व्यक्तींची नावे नॉमिनी म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

बँकिंग नियमन दुरुस्ती विधेयक १९४९ च्या कलम ४५ झेडए च्या प्रस्तावानुसार बँक खातेधारक एकापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त चार नॉमिनी आपल्या बँक खात्यासाठी देऊ शकणार आहेत. मात्र,त्यासाठी खातेदाराला प्रत्येक नॉमिनीच्या नावासमोर त्या चौघांना ठेव रकमेतून मिळणाऱ्या प्रमाणाची घोषणा करावी लागणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या