Home / News / राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान १६ ऑगस्टपासून खुले

राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान १६ ऑगस्टपासून खुले

नवी दिल्ली- राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान १६ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी खुले करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अमृत उद्यानाचे उद्घाटन...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान १६ ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी खुले करणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज अमृत उद्यानाचे उद्घाटन केले. दरवर्षी देशभरातील ५ ते ६ लाख लोक अमृत उद्यानाला भेट देत असतात.

राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, यावर्षी सामान्य नागरिक १६ ऑगस्टपासून १५ सप्टेंबर या कालावधीत सकाळी १० ते ६ या वेळेत अमृत उद्यानाला भेट देऊ शकतील. सोमवारी उद्यान बंद राहील. यासाठी ऑनलाइन पद्धतीने तिकीट आरक्षित करता येतील. दरवर्षी देशभरातुन लाखो लोक अमृत उद्यानाला भेट देण्यासाठी येत असतात. उद्यानात विशेष सेल्फी पॉइंटही बनवण्यात आला आहे. २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने खेळाडूंसाठी तर ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या निमित्त शिक्षकांसाठी उद्यानात प्रवेश राखीव ठेवण्यात आला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या