Home / News / शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी तेजी

शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी तेजी

मुंबई – देशातील दोन प्रमुख शेअर बाजार आज सलग सहाव्या दिवशी तेजीसह बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४० अंकांच्या वाढीसह...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – देशातील दोन प्रमुख शेअर बाजार आज सलग सहाव्या दिवशी तेजीसह बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १४० अंकांच्या वाढीसह तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४० अंकांच्या वाढीसह बंद झाला.
बाजार बंद होताना सेन्सेक्स ८१,०५३ अंकांवर बंद झाला. तर निफ्टी २४,८१० अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्समधील ३० पैकी १८ कंपन्यांचे शेअर वधारले. तर निफ्टीच्या ५० पैकी २५ कंपन्यांचे शेअर वधारले. निफ्टीच्या २५ कंपन्यांमध्ये काहीशी घसरण झाली.
ग्राहकोपयोगी वस्तु, धातु, बँकिंग, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमधील शेअरमध्ये मोठी खरेदी दिसून आली. तर वाहन, आयटी, औषधनिर्मिती, ऊर्जा, आरोग्य सेवा या क्षेत्रांमधील शेअर्समध्ये घसरण झाली.

Web Title:
संबंधित बातम्या