Home / News / अयोध्येतील राममंदिराला वर्षभरात ३६३ कोटींचे दान

अयोध्येतील राममंदिराला वर्षभरात ३६३ कोटींचे दान

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिराला या वर्षभरात ३६३ कोटी ३४ लाख रुपयांचे दान मिळाल्याची माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

अयोध्या – अयोध्येतील राम मंदिराला या वर्षभरात ३६३ कोटी ३४ लाख रुपयांचे दान मिळाल्याची माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने दिली आहे. राममंदिराच्या गेल्या वर्षभरातील म्हणजे १ एप्रिल २३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीतील जमाखर्च राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सार्वजनिक केला आहे.राम मंदिराला मिळालेल्या ३६३ कोटी ३४ लाख रुपयांपैकी ५३ कोटी रुपये देणगीपत्राद्वारे मिळालेले असून रामलल्लाच्या हुंडीत २४ कोटी ५० लाख रुपये तर ७१ कोटी ५१ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने मिळाले आहेत. विदेशातून १० कोटी ४३ लाख रुपये दान प्राप्त झाले आहे. या मंदिराला गेल्या ४ वर्षात १३ क्विंटल चांदी व २० किलो सोने मिळाले असून पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीच्या नावाने २१०० कोटी रुपयांचा धनादेश मिळाला आहे. या आर्थिक वर्षात राम मंदिर व इतर बांधकामांसाठी एकूण ७७६ कोटी रुपयांचा खर्च आला. त्यापैकी ५४० कोटी रुपयांचा खर्च केवळ राम मंदिराच्या उभारणीसाठी झाला.

Web Title:
संबंधित बातम्या