Home / News / चीन मॅग्नेटिक स्पेस लाँचरद्वारेचंद्रावरून हेलियम आणणार

चीन मॅग्नेटिक स्पेस लाँचरद्वारेचंद्रावरून हेलियम आणणार

बिजिंग -चीनने आणखी महत्त्वाकांक्षी अंतराल योजना आखली आहे. चिनी शास्त्रज्ञ चंद्रावरून पृथ्वीवर हेलियम आणण्यासाठी मॅग्नेटिक स्पेस लाँचर बनवण्याची तयारी करत...

By: E-Paper Navakal

बिजिंग -चीनने आणखी महत्त्वाकांक्षी अंतराल योजना आखली आहे. चिनी शास्त्रज्ञ चंद्रावरून पृथ्वीवर हेलियम आणण्यासाठी मॅग्नेटिक स्पेस लाँचर बनवण्याची तयारी करत आहेत. या लाँचरचे वजन ८०० क्विंटल असेल आणि त्याची किंमत सुमारे दीड लाख कोटी रुपये इतकी अफाट असेल.

शांघाय इन्स्टिट्यूट ऑफ सॅटेलाइट इंजिनीअरिंगच्या संशोधकांच्या मते, हेलियम-३ न्यूक्लियर फ्यूजन हा स्वच्छ ऊर्जा मिळविण्याचा एक आश्वासक मार्ग आहे. केवळ २० टन हेलियम-३ हे चीनची वर्षभराची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी पुरेसे ठरू शकते.

लाँचर कधी तयार होईल याची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही. ते चंद्राच्या पृष्ठभागावर किमान २० वर्षे टिकेल अशी रचनाअसेल. ही योजना रशिया आणि चीनच्या संयुक्त अंतराळ कार्यक्रमाचा भाग असू शकते, असे मानले जात आहे. यामध्ये दोन्ही देशांनी 2035 पर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन केंद्र बांधण्याचा प्रस्तावही आहे.

Web Title:
संबंधित बातम्या