नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन नवीन वंदे भारत ट्रेनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. फ्लॅग ऑफ समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, वंदे भारत गाड्यांचा विस्तार हा आधुनिकता आणि गतीसह विकसित भारताच्या ध्येयाकडे आपल्या देशाची प्रगती दर्शवितो. या तीन ट्रेन मेरठ- लखनऊ, मदुराई – बेंगळुरू आणि चेन्नई – नागरकोइल दरम्यान धावतील. २०४७ पर्यंत विकसित भारतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांचा वेगवान विकास महत्त्वाचा आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकला वाढीव अर्थसंकल्पीय वाटपामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये रेल्वे वाहतूक बळकट झाली आहे.
