Home / News / गणेशोत्सव काळात मेट्रोच्या रात्री विशेष वाढीव फेऱ्या !

गणेशोत्सव काळात मेट्रोच्या रात्री विशेष वाढीव फेऱ्या !

मुंबई- गणेश उत्सवात नागरिकांचे रात्रीच्या प्रवासात हाल होऊ नयेत यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएने नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- गणेश उत्सवात नागरिकांचे रात्रीच्या प्रवासात हाल होऊ नयेत यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएने नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत मेट्रोच्या अधिक फेऱ्या आणि विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

महामुंबई मेट्रो प्रशासनाच्या निर्णयानुसार ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. त्याचप्रमाणे अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ ३० मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनलवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री ११.१५ आणि ११.३० वाजता सुटतील.गुंदवली ते दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरु केल्या जातील. त्याचप्रमाणे मेट्रोच्या एकूण २० अतिरिक्त फेऱ्याही सोडण्यात येणार आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या