Home / News / दिल्ली दंगल! काँग्रेस नेते टायटलरांवर आरोप निश्चित

दिल्ली दंगल! काँग्रेस नेते टायटलरांवर आरोप निश्चित

नवी दिल्ली- दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर १९८४ साली दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्यावर दंगली...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली- दिल्ली न्यायालयाने काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्यावर १९८४ साली दिल्लीत झालेल्या दंगलप्रकरणी आरोप निश्चित केले आहेत. त्यांच्यावर दंगली भडकावणे, घुसखोरी, चोरी यासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत ही दंगल उसळली होती. यावेळी शीख समुदायाच्या काही लोकांना लक्ष्य करण्यात आले होते. या प्रकरणी सीबीआयने जगदीश टायटलर यांना २००७ व २०१३ साली क्लीन चिट दिली होती. २०१५ साली याचिकाकर्त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार सीबीआयने २० मे २०२३ रोजी टायटलर यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ ऑक्टोबरला होणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या