Home / News / हदगाव तहसील कार्यालयावर स्वराज्य पक्षाचा बैलगाडी मोर्चा

हदगाव तहसील कार्यालयावर स्वराज्य पक्षाचा बैलगाडी मोर्चा

नांदेड- नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...

By: E-Paper Navakal

नांदेड- नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वराज्य पक्षाने आज हदगाव तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्या, अन्यथा येणाऱ्या २७ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात वळू सोडण्याचा इशारा स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव पाटील देवसकर यांनी दिला. या मोर्चात स्वराज्य पक्षासह शेतकरी बैलगाडी घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होते. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजी राजे यांनी या भागाची पाहणी केली होती. त्यांनी त्यांनी शेतकर्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी सरकारकडे केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. त्यामुळे स्वराज्य पक्ष आक्रमक होऊन बैलगाडी मोर्चा काढला.

Web Title:
संबंधित बातम्या