Home / News / ‘हिंदुस्थान झिंक ‘ चे विभाजन दोन कंपन्या करण्याचा प्रस्ताव

‘हिंदुस्थान झिंक ‘ चे विभाजन दोन कंपन्या करण्याचा प्रस्ताव

उदयपूर- १९६६ साली स्थापन झालेल्या हिंदुस्थान झिंक लिमिटेड या वेदांत समुहाच्या कंपनीचे तीन ऐवजी दोन कंपन्यांमध्ये विभाजन केले जाणार आहे.त्याबाबतच्या...

By: E-Paper Navakal

उदयपूर- १९६६ साली स्थापन झालेल्या हिंदुस्थान झिंक लिमिटेड या वेदांत समुहाच्या कंपनीचे तीन ऐवजी दोन कंपन्यांमध्ये विभाजन केले जाणार आहे.त्याबाबतच्या प्रस्तावावर नव्याने सरकारशी चर्चा करण्यात आली असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मिश्रा यांनी दिली.

अरुण मिश्रा म्हणाले की,
हिंदुस्थान झिंक लिमिटेड या कंपनीचे तीन कंपन्यांमध्ये विभाजन करण्याची योजना होती. परंतु या खाण कंपनीत २९.५४ टक्के भागीदारी असलेल्या सरकारने या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे ही योजना स्थगित केली होती. मात्र आता तीन ऐवजी दोन कंपन्यामध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या नवीन प्रस्तावावर आम्ही सरकारतर्फे खाण सचिव यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच सरकार आणि कंपनी या विषयावर आणखी संवाद साधत आहे.त्यासाठी खाणी आणि स्मेल्टरसह मालमत्तेची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे.

Web Title:
संबंधित बातम्या