विसर्जन मिरवणुकीत कापसाचे बोळे वाटप

इचलकरंजी- गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून आबालवृद्धांचे कान सुरक्षित ठेवण्यासाठी इचलकरंजीतील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी एक आगळीवेगळी सेवा प्रदान केली. डॉ.तोष्णीवाल यांनी पिशवी भरून कापसाचे बोळे आणले होते. मिरवणूक मार्गावर येजा करणाऱ्यांना कापसाच्या बोळ्याचे वाटप केले. यंदाही शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाची सर्व मर्यादा ओलांडल्याचा अनुभव नागरिकांना आला. डीजेच्या आवाजाने अनेक नागरिकांच्या हृदयाचे ठोके वाढले. एवढेच नव्हे तर मधील अनेक घरांतील वस्तूही थरथरत होत्या. त्यामुळे या डॉ. तोष्णीवाल यांनी केलेल्या कापूस बोळे वाटपाचे नागरिकांकडून कौतुक होत होते.