Home / News / बांगलादेशाने हिल्सा माशांच्या निर्यातीवरील बंदी उठवली

बांगलादेशाने हिल्सा माशांच्या निर्यातीवरील बंदी उठवली

ढाका- बांगलादेशने हिल्सा माशांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. दुर्गापूजेच्या काळात या माशाला पश्चिम बंगालमध्ये मोठी मागणी असते. परंतु या माशाचे...

By: E-Paper Navakal

ढाका- बांगलादेशने हिल्सा माशांच्या निर्यातीवरील बंदी उठवली आहे. दुर्गापूजेच्या काळात या माशाला पश्चिम बंगालमध्ये मोठी मागणी असते. परंतु या माशाचे शेख हसीना सरकार पायउतार झाल्यानंतर या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती.

आता बांगलादेशने दुर्गापूजा काळातील हिल्सा माशांची मागणी पूर्ण करण्यासाठी ही बंदी उठवण्यात आली आहे. बांगलादेशने ३००० टन हिल्सा माशांच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. बांगलादेश हिल्सा माशांचा सर्वात मोठा उत्पादक आहे. दुर्गापूजेचा सण दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. त्यामुळे ही बंदी उठवण्यात आले आहे. स्थानिकांना होणाऱ्या माशांच्या पुरवठ्यात खंड पडू नये, असे सांगत अंतरिम सरकारने ही बंदी उठवली.

Web Title:
संबंधित बातम्या