Home / News / सज्जनगडावर कचर्‍याचे ढीग! व्यावसायिकांवर होणार कारवाई

सज्जनगडावर कचर्‍याचे ढीग! व्यावसायिकांवर होणार कारवाई

सातारा – जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले सज्जनगडावर अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग जमा झाले आहेत. गडावरील वाहन तळ पायरी मार्ग, तसेच गडाच्या...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

सातारा – जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले सज्जनगडावर अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग जमा झाले आहेत. गडावरील वाहन तळ पायरी मार्ग, तसेच गडाच्या पाठीमागील बाजूला हे कचऱ्याचे ढिग जमले आहेत. चार दिवसांपूर्वी या गडावर राबविलेल्या स्वच्छता अभियानावेळी ही गोष्ट हाताळली. त्यामुळे आता प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना नोटिसा देऊन कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

सज्जनगडावरील हा कचरा प्रामुख्याने प्लास्टिकचा असून तो व्यावसायिकांनी टाकला आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशा सूचना गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिल्या आहेत. गडावरील व्यवसायिकांना प्रशासनाकडून नोटीस देण्यात येणार असून त्यात बदल न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विस्तार अधिकारी शंतनू राधे यांनी दिली आहे.चार दिवसापूर्वी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यासाठी तालुका ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी गडावर गेले होते. यावेळी गडावर कचऱ्याचे ढिगारे पाहून तेही अवाक झाले.

Web Title:
संबंधित बातम्या