वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या ५ ऑक्टोबर रोजी वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. दौऱ्यावर असताना बंजारा समाजाची काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील मंदिराला भेट देणार आहेत. बंजारा हेरिटेज म्युझियमचे उद्घाटन देखील करणार आहे. बंजारा समाजाच्या संस्कृतीचे आणि परंपराचे दर्शन घडवणारा या नंगारा वास्तूसाठी महायुती सरकारने ७२५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या उद्घटनावेळीस महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील लाखो बंजारा समाजाचे लोक उपस्थित राहणार आहेत.
