Home / News / द. आफ्रिकेत २ गटांत गोळीबार १७ जणांचा मृत्यू!एक जण गंभीर

द. आफ्रिकेत २ गटांत गोळीबार १७ जणांचा मृत्यू!एक जण गंभीर

केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेच्या लुसीकिसिकी शहरात दोन गटांत झालेल्या गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये १५...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

केपटाऊन – दक्षिण आफ्रिकेच्या लुसीकिसिकी शहरात दोन गटांत झालेल्या गोळीबारात १७ जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये १५ महिला आणि २ पुरुषांचा समावेश आहे.एका मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतात आहे.दक्षिण आफ्रिकन पोलिसांचे राष्ट्रीय प्रवक्ते अथलेंडा मॅथे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केलेला आहे. आम्ही आरोपींना जेलबंद करुन कडक कारवाई करणार आहे. पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तज्ञ आणि गुप्तहेरांची एक टीम बोलावली आहे. ज्यामुळे प्रकरण सोडविण्यात मदत होईल. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील १३ महिलांचा मृत्यू झाला आहे.

Web Title:
संबंधित बातम्या