Home / News / राजदचे पंकज यादव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार

राजदचे पंकज यादव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार

पटना – बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील विमानतळ परिसरात आज मॅार्निग वॅाकसाठी गेलेले राजद पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पंकज यादव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

पटना – बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील विमानतळ परिसरात आज मॅार्निग वॅाकसाठी गेलेले राजद पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पंकज यादव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. त्यांच्यावर मुंगेर नॅशनल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहेत.

दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पंकज यादव यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक त्यांच्या छातीत लागली. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. इतर लोकांनी जखमी झालेल्या पंकज यादव यांना तातडीने मुंगेर नॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्या छातीतून गोळी काढली. मुंगेर नॅशनल हॉस्पिटलचे डॉ प्रशांत त्रिपाठी म्हणाले की, एक गोळी पंकज यादव यांच्या हृदयाजवळ डाव्या बाजूला लागली होती. ती गोळी आम्ही शस्त्रक्रिया करुन काढली. त्यांची प्रकृती सध्या ठिक आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले की, या घटनेबाबत काही लोकांची नावे समोर आली आहेत. ज्यात मिठू यादव आणि नमन यादव यांचा समावेश आहे. मिठू यादव हा गुन्हेगार सावन यादवचा मेहुणा आहे.

Web Title:
संबंधित बातम्या