Home / News / डहाणू किनारपट्टीवर संशयित बोटीचा शोध

डहाणू किनारपट्टीवर संशयित बोटीचा शोध

पालघर – डहाणू तालुक्याच्या समुद्रकिनारी संशयित हालचाली करणारी बोट दिसल्याने किनारपट्टी भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संशयित बोट...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

पालघर – डहाणू तालुक्याच्या समुद्रकिनारी संशयित हालचाली करणारी बोट दिसल्याने किनारपट्टी भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संशयित बोट शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष शोध मोहीम सुरू केली आहे.

तालुक्यातील घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील चिखले बडकती पाडा या गावातील तीन जणांनी गुरुवारी ही संशयित बोट पाहिली.याठिकाणी असलेल्या समुद्रकिनारी क्रिकेट मैदान परिसरातील कठड्यावर गावातील प्रथमेश जोंधळेकर,सुजित जोंधळेकर व उमेश जोंधळेकर हे तिघेजण मध्यरात्रीच्या सुमारास मोबाईलवर गेम खेळत बसले होते.त्यावेळी समुद्रामध्ये उभ्या असलेल्या मासेमारी बोटीजवळ ही संशयित बोट त्यांना दिसून आली. ही संशयित बोट या भागातील बोटीपेक्षा वेगळी व मोठी अशी होती.या बोटीमध्ये हिरव्या पांढऱ्या रंगाचा लख्ख प्रकाश पाडणारे विजेचे दिवे होते. ही बोट पुढच्या बाजूने टोक उंच असलेली होती. तिच्या मागच्या
बाजूला केबिन होती. ती काही वेळात या भागातून नाहीशी झाली.

Web Title:
संबंधित बातम्या